online biz

Get Your Business Online करा ऑनलाइन बिझनेसची सुरुवात.

करा ऑनलाइन बिझनेसची सुरुवात.

सध्याचे युग इंटरनेटचे असल्याने ऑनलाइन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे. ऑनलाइन व्यवसायासाठी ग्राहकही ऑनलाइन मिळविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक व्यवसायाच्या चौकटी मोडून ऑनलाइन व्यवसायाचा श्रीगणेशा कसा करायचा या विषयी माहिती देत आहोत.

हल्लीच्या काळात इंटरनेट किंवा ऑनलाइन जगाचा गंध नसलेली किती मंडळी असतील?..पारंपरिक उद्योगाची नाळ अजूनही टिकविणाऱ्यांसमोर हल्लीच्या स्मार्ट आणि वेगवान ‘ई-कॉमर्स’ उद्योगाने मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पारंपरिक उद्योग तोट्यात जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बऱ्याच जणांनी आपला उद्योग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेबसाइटच्या मदतीने बऱ्याच जणांनी आपल्या पारंपरिक उद्योगाला ऑनलाइनची जोड दिली आहे. काही छोट्या उद्योगांनीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अवलंब केलेला दिसून येतो.

ऑनलाइनची आवश्यकता काय?

पारंपरिक व्यवसाय करणारा सहजासहजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येण्यास तयार होत नाही. या माध्यमातून नसत्या उठाठेवी का करा, ही त्यामागील भावना असते. या दरम्यान, सध्याच्या इंटरनेटच्या आणि स्पर्धेच्या जगात टिकून राहायचे असेल, तर ऑनलाइनशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्या गावीही नसते. वाढती स्पर्धा, विस्तारते आणि जवळ येणारे जग पाहता सद्य परिस्थितीत ऑनलाइनशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.

ऑनलाइन बोले तो..

व्यवसाय ऑनलाइन माध्यमाशी जुळवून घेण्याचा प्रकार व्यवसायानुसार वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ..सेवा उद्योगांसाठी ऑनलाइन माध्यमाशी जुळवून घेणे म्हणजे नवनवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपल्या सेवा वापरण्यास भाग पाडणे होय. विशिष्ट उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी ऑनलाइन माध्यमातून उत्पादनांची नोंदणी करणे आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते. अशा कंपन्या दोन मार्गांनी ऑनलाइन जगतात प्रवेश करू शकतात..

 

१. वेबसाइट तयार करून 

२. आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या ‘ई-कॉमर्स’पोर्टलची मदत घेऊन..

 

वेबसाइट का बनवावी?

– हल्ली कोणतीही सेवा असो की उत्पादन लोकं सर्वप्रथम त्याविषयीची माहिती ऑनलाइन माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत संबंधित उत्पादनाची अथवा सेवेची इत्थंभूत माहिती देणारी वेबसाइट अथवा पोर्टल असणे अधिक महत्त्वाचे आहे.

– ऑनलाइन माध्यमातून आपली सेवा अथवा वस्तू दाखवली जाऊ शकते अथवा तिचे मार्केटिंग केले जाऊ शकते. – तुमच्या व्यवसायाचे ठिकाण दर्शविण्यासाठी ही सर्वांत उपयुक्त आ​णि चांगली पद्धती आहे. – जर तुम्हाला कोणत्याही उत्पादनाची विक्री करायची असेल, तर कमी खर्चांत सर्वत्र पोहोचण्यासाठी वेबसाइटची मदत होऊ शकते. 

मात्र, मोठी ई-कॉमर्स वेबसाइट बनवणे आणि तिचा मेंटेनन्स करणे या अतिशय खर्चिक बाबी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लहान उद्योजक असाल, तर आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या ‘ई-कॉमर्स’ वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही उत्पादनांची विक्री करू शकता. .. किंवा स्वतची वेबसाइट देखील सुरू करू शकता.

 

स्वतःच्या वेबसाइटवर कधी विक्री करावी?

– जोपर्यंत तुम्ही तुमचे उत्पादन कस्टमाइज करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते ऑनलाइन विक्री करणे महागच पडू शकते. किंवा तुमचं प्रॉडक्ट ओर सर्व्हिसला चांगली डिमांड असेल तरच.

उदाहरणार्थ..जर तुम्ही अतिशय साधारण कपड्यांची ऑनलाइन विक्री करीत आहात, तर तुम्ही विशेष कपड्यांची विक्री करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या अनोख्या वैशिष्ट्यांची जाहिरात ऑनलाइन माध्यमातून केल्यास त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. .. वेबसाइटचे महत्त्व ओळखा

अवघ्या पाचशे रुपयांत वेबसाइट करून देऊ, अशा प्रकारच्या अनेक जाहिराती तुमच्या पाहण्यात आल्या असतील. जर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि चांगल्या प्रकारची वेबसाइट तयार करायची असेल, तर खर्चही मोठ्या प्रमाणावत वाढतात. म्हणूनच बहुसंख्य व्यावसायिक ऑनलाइन येण्यास सहजासहजी तयार नसतात. अशा परिस्थितीत वेबसाइट तयार करण्यास नेमका किती खर्च येतो, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल आणि त्या विषयी लोकांना माहिती द्यायची असेल, तर किमान ५ ते १० पेजेसची गरज भासते. या मध्ये उत्पादन अथवा सेवेविषयी माहिती, ते मिळण्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांकाचा अंतर्भाव करण्यात येतो. अशाप्रकारच्या वेबसाइट अतिशय बेसिक स्वरूपाच्या असतात. अशाप्रकारच्या वेबसाइटच्या निर्मितीसाठी अतिशय कुशल तंत्रज्ञाची आवश्यकता नसते आणि खर्च देखील माफक असतो.

 

वेबसाइट तयार करण्याचा खर्च

 

– एक वेबसाइट तयार करण्यासाठी ₨ ५,००० ते ₨ १५,००० पर्यंत खर्च येतो. 

यामध्ये होस्टिंगचा खर्च (२,५०० ते ४,०००) डोमेन खरेदीचा खर्च (वार्षिक ५०० ते १५००) डिझाइन आणि लेआउटचा खर्च (दर्जाप्रमाणे) आदींचा समावेश असतो. – जर तुम्हाला वस्तू अथवा सेवांच्या विक्रीसाठी वेबसाइटची आवश्यकता असेल, तर अशा वेबसाइटच्या निर्मितीसाठी फारसा खर्च येत नाही. अशा वेबसाइट तयार करण्यासाठी अतिकुशल तंत्रज्ञांची आवश्यकताही नसते. 

 

अतिशय कमी खर्चात ही वेबसाइट तयार होऊ शकते

जर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि दर्जेदार वेबसाइट तयार करायची असेल, जसे की Amazon, Flipkart तरच खर्च १,००,००० ते पाच लाखांच्या दरम्यान येऊ शकतो. – अशा वेबसाइटमध्ये उत्पादनांचा समावेश करायचा असतो. एकदा उत्पादनांचा समावेश केल्यानंतर जगभरातील ग्राहक खरेदीसाठी तेथे येणार असते. त्यामुळे हा ताण सहन करण्यासाठी मोठी वेब हो​स्टिंग सेवा आणि जास्त स्पेसची आवश्यकता असते. – अशा वेबसाइटवर लोकांकडून खरेदी-विक्री आणि पेमेंट होत असल्याने त्यांच्या मेंटेनन्सची आवश्यकता भासते. अशा प्रकारच्या वेबसाइट २४ तास चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी कर्मचारी भरती करणे भाग पडते. – ई-कॉमर्स वेबसाइटवर ट्रॅफिकच्या हिशेबानुसार सातत्याने फेरबदल करण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी एका चांगल्या इंजिनीअरची गरज भासते.

 

काळानुसार बदलली वेबसाइट

बदलत्या काळानुसार वेबसाइटमध्येही बदल झाले आहेत. सध्याच्या जमान्यात लोकांचा कम्प्युटरपेक्षा मोबाइल आणि टॅब्लेटच्या माध्यमातून ऑनलाइन सर्फिंग आ​णि खरेदी करण्यावर अधिक भर आहे. अशा परिस्थितीत स्क्रीनचा बदलता आकार आणि वेग यांप्रमाणे वेबसाइटच्या रंगरूपात अधिक बदल झाले आहेत. सद्य परिस्थितीत वेबसाइटचे दोन प्रकार पडतात..

 

 १. स्टॅटिक वेबसाइट : या प्रकारात कम्प्युटर स्क्रीनच्या हिशेबात स्टँडर्ड पद्धतीने वेबसाइटची निर्मिती केली जाते. त्यामुळे अशा वेबसाइटचे रिजोल्युशन आ​णि आकार निश्चित असतो.

वैशिष्ट्ये : कमी किंमत, कमी मेंटेनन्स

कमतरता : छोट्या स्क्रीनमुळे अधिक माहिती घेण्यासाठी वेबसाइटचे अन्य पेजेस पाहण्यासाठी सातत्याने वरखाली, डावीकडे-उजवीकडे हालचाल करावी लागते. मोबाइलवर सर्फिंग करताना अडचणी येतात.

 

२. डायनॅमिक वेबसाइट : या प्रकारच्या वेबसाइटमध्ये स्क्रीनच्या आकाराप्रमाणे वेबसाइटमध्ये बदल करता येतात. जर तुमच्या उपकरणावर इंटरनेटचा वेग कमी असेल, तर त्याप्रमाण वेबसाइट फीचर्स डिअॅक्टिव्ह करते. त्यामुळे वेबसाइट उघडण्यास मदत होते.

वैशिष्ट्ये : कोणत्याही उपकरणावर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्पीडमध्ये इंटरनेट सर्फिंग करता येते.

तयार करण्याचा आणि मेंटेनन्स करण्याचा खर्च कमी.

 

ऑनलाइन उद्योजक बनण्याची करा तयारी

अशी विक्री करा..

 

खोटी आश्वासने देऊ नका : तुमच्या सेवेविषयी माहिती देत असताना कोणतीही खोटी माहिती अथवा आश्वासने देऊ नका. 

चुकीची माहिती आणि चुकीचे वर्णन तुम्हाला अडचणीत टाकू शकते. – विस्तृत मा​हिती द्या : ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकाला ती वस्तू प्रत्यक्षात समोर पाहण्याची संधी फारच कमी असते.

 अशा परि​स्थितीत संबंधित विक्रेत्याने उत्पादनानविषयी अधिक माहिती देण्याची आवश्यकता असते. त्यातून तुमच्या उत्पादनाचे मार्केटिंग होते.

 – त्वरित डिलिव्हरी द्या : ऑनलाइन माध्यमातून उत्पादनाचे बुकिंग झाल्यानंतर त्वरित त्याची डिलिव्हरी करा. अधिक उशीर झाल्यास ​ऑर्डर रद्द करण्याचा अधिकार ग्राहकाने राखून ठेवलेला असतो.